ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली