10 months ago

आई राजा उदो उदो... येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेला सुरुवात

Maharashtra Times
Maharashtra Times
उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील आराध्य दैवत असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सुरुवात झाली आहे. आज लाखोंच्या संख्येने भाविक भक्त आले आहेत. भाविक हळदीने माखून गेल्याचं दिसत आहे. तसेच देवी भक्तांनी फुगडीचा ताल धरला आहे. सध्या पालकी गावात असून भक्त देवीचा चुना वेचण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच दिवस देवीच्या दर्शनाचा लाभ घेणार आहेत. येडेश्वरी अर्थात आई येडाईचे भक्त राज्यभरातून या यात्रेला हजेरी लावतात. कोरोनामुळं मागील दोन वर्ष ही यात्रा झाली नव्हती. यंदा मात्र उत्साह आहे.

Browse more videos

Browse more videos