तीन महिन्यापूर्वी सुरक्षा काढली जाणं, त्यानंतर दिवसाढवळ्या घरासमोरच गोळीबार करून हत्या होणं यामुळे सध्या नांदेडच्या बांधकाम व्यवसायिकांचं हत्याकांड गाजतंय, हा बांधकाम व्यवसायिक कोण होता? त्यांची हत्या का करण्यात आली? आणि याप्रकरणी पोलिसांबाबात लोकांमध्ये रोष का निर्माण झालाय हे सविस्तर या व्हिडिओतून समजून घेऊ नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेल्या संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोरच मंगळवारी हत्या करण्यात आली. दुचाकीवर आलेल्या दोघांनी संजय बियाणींवर चार गोळ्या झाडल्या. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा कार चालक गंभीर जखमी झाले होते. नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात बियाणींवर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान संजय बियाणी यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय. संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केलाय.. गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
Be the first to comment