मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची कात्रज येथे भेट घेतली. मुंबईत राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केल्यानंतर बाबर यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना नवनियुक्त निमित्त शुभेच्छा दिल्या. कात्रज येथे साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांनी भेटीदरम्यान चाय पे चर्चा ही केली. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.
Be the first to comment