बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत पुन्हा बाऊन्सर कडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेल द्वारे पाठवले टीसी देखील पाठवण्यात आले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Be the first to comment