नागपुरात नुकतीच एक धाड पडली आणि कारवाई झाली. आता प्रकरण अकोल्यातलं होतं. शिवसेना आमदाराच्या घरात एक अधिकारी घुसला. आता आपलाही नंबर आलाय असं या आमदाराला वाटू लागलं आणि भीती तयार झाली. पण तेवढ्यातच बिंग फुटलं आणि सगळं काही समोर आलं. शिवसेना आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यावर 'आयबीचा माणूस' असल्याचं सांगत एक व्यक्ती घुसला. बंगल्यात शिरल्यावर समोरच्या सोफ्यावर बसून घर, गाड्यांची कागदपत्रे मागू लागला. पण आमदारसाहेबांच्या कुटुंबीयांना काहीतरी वेगळी चाहूल लागली आणि बिंग फुटलं. ३२ वर्षीय प्रतिक संजयकुमार गावंडेच्या आता पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.
Be the first to comment