शिर्डीत साई दर्शनासाठी असलेली बायोमेट्रिक पासची सक्ती एक एप्रिलपासून मागे घेत असल्याची घोषणा साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने नुकतीच केली होती. मात्र मंदिराच्या प्रवेश दारावर पास मागितला जात असल्याने भक्तांममध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे विश्वस्त मंडळ आणि साई संस्थान प्रशासन यांच्यातील समन्वय समोर आला..अखेर साई भक्तांच्या नाराजीमुळे बायोमेट्रिक पास काऊंटर बंद करून भाविकांना थेट दर्शन रांगेत प्रवेश सुरू करण्यात आला...
Be the first to comment