क्रिकेट चाहते मागील वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आजपासून आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामात एकूण १० संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन संघ वाढल्यामुळे यावेळी सामन्यांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना खेळवला जात आहे. यावर क्रिकेट चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहे पाहा..
Be the first to comment