नाथांच्या नगरीत भक्तीचा सागर; शेकडो दिंड्या, हजारो वारकरी दाखल

  • 2 years ago
राज्यातील महत्त्वाची यात्रा समजल्या जणाऱ्या पैठण नाथ षष्ठी यात्रेला आजपासून सुरवात झाली आहे. हजारो वारकरी सकाळपासून नाथनगरीत दाखल झाले आहेत. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णक्षमतेने ही यात्रा भरली असल्याने नाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत. सकाळपासून पैठणनगरीत तब्बल साडेचारशेपेक्षा अधिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. तर नाथ समाधी वाड्यात नाथ महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासून लाखो भाविक पहाटेपासून नाथ रांगा लावून उभे होते. तर पैठण यात्रेत ४०० वर्षांहून अधिक वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा आहे. तर आजपासून तीन दिवस हा सोहळा चालणार आहे.

Category

🐳
Animals

Recommended