Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 years ago
फिल्मी मिर्ची या शिल्पा शेट्टीच्या शोची पहिली गेस्ट म्हणून अभिनेत्री शहनाज असणार आहे. शोच्या सेटवर या स्पॉट शिल्पा शेट्टी, शहनाज गिल आणि ताहिरा कश्यप स्पॉट झाल्या. एकमेकींचा हात पकडून पोज देताना दिसल्या. सिद्धार्थ शुक्ला गेल्यानंतर शहनाज गिल एकटीच पडली. तर शिल्पा शेट्टीच्या पतीलाही काही दिवसांसाठी तुरुंगात जावे लागले. या दोन्ही अभिनेत्री या शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील चांगले आणि वाईट अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. याशिवाय अभिनेत्री ताहिरा कश्यपदेखील या शोमध्ये शिल्पा शेट्टीची गेस्ट म्हणून पाहायला मिळणार आहे. या अभिनेत्रींच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल ऑल ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली. शिल्पा शेट्टीही फुल ऑरेंज लूकमध्ये दिसली. तर ताहिरा कश्यपचाही लूक सर्वात आकर्षक होता.

Category

😹
Fun

Recommended