Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/18/2022
करुणा मुंडे यांच्या नव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज औरंगाबादमध्ये आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी कोरोना नियमांचे कारण दाखवत जिल्ह्यातील या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगावात करुणा मुंडे यांचा कार्यक्रम नियोजित होता. त्यांनी नव्यानं काढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. संबंधित बैठक घेतली जाऊ नये, अन्यथा कारवाईच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं या पक्षाचं नाव असून लवकरच मोठा मेळावा घेणार असल्याचंही त्यांनी घोषणेत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन उभं करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं असून चित्तेपिंपळगावात यासंबंधी कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

Category

😹
Fun

Recommended