Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/10/2022
ड्रामा क्वीन उर्फी जावेदचा एक भलताच लुक चाहत्यांसमोर आला आहे. कारण तिनं जो टी शर्ट परिधान केला आहे त्याच्यावर काहीसा वेगळा संदेश लिहिला आहे. हा मेसेज सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. यावर लिहिण्यात आलं आहे की, मी काय जावेद अख्तर यांची नात नाही...तिनं असं का लिहिलं आहे याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. विमानतळावर स्पॉट झालेल्या उर्फीचे मत आहे की, माझ्या टीशर्टकडे लक्ष देऊ नका. कारण दररोज मला ट्वीटरवर काही लोक टॅग करतात आणि सांगतात की, या जावेद अख्तर यांच्या नातीला काही तर शिकवा. मी लोकांच्या या गोष्टीला आता वैतागले आहे. मला सांगायचे आहे की, मी जावेद अख्तर यांची नात नाही. यावेळी उर्फीने गीता सुद्धा हातात धरलेली दिसत होती. उर्फीची स्टाईल पाहता तिचा काही धार्मिक पुस्तकांशी संबंध असेल का, असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे.

Category

🗞
News

Recommended