Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/4/2022
उत्तर प्रदेशमधील महिला काँग्रेस नेत्या आणि बरेलीच्या माजी महापौरी सुप्रिया अॅरॉन यांनी आयोजित केलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक जण जखणी देखील झाले. तर उत्तर प्रदेशमध्ये देखील आज तशीच मोठी दुर्घटना टळल्याचा प्रकार समोर आला आहे.यामध्ये शेकडो महिला आणि मुली सहभागी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. मॅरेथॉन सुरू करण्याचा इशारा होताच या महिला आणि मुलींनी धावायला सुरुवात केली. पण काही क्षणाच पुढच्या काही मुली खाली पडल्या. त्यांच्या मागून शेकडो मुली आणि महिला धावत येत होत्या. मागून येणाऱ्या शेकडो स्पर्धकांमुळे पुन्हा एकदा देशात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडू शकली असती. वेळीच आयोजकांपैकी काही सदस्य मुलींना पुन्हा उचण्यासाठी आले. व त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Category

🗞
News

Recommended