Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/29/2021
#मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेलं बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न आज अखेर पूर्णत्वास गेलं आहे. आष्टी ते नगर या लोहमार्गाचे साठ किलोमीटर काम पूर्ण झाल्याने, आज या लोहमार्गावर प्रत्यक्षात रेल्वेची हाई स्पीड चाचणी घेण्यात आली.बीडकरांना मिळालेलं नवीन वर्षाचं हे गिफ्टच म्हणाव लागेन.बीड जिल्ह्यात ही पहिलीच रेल्वे धावल्याने सर्वांमध्येच उत्साह दिसून येत होता.रेल्वेला फुलांनी सजवण्यात आलं होत.सर्वांनी रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती.बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं, हे चित्र डोळ्यात साठवण्यासाठी लहान चिमुकल्यांसह स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. रेल्वे इंजन डब्यांना जोडल्यानंतर स्थानिकांनी रेल्वेला हार घालून आणि फुलं उधळून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केलं. तसेच लवकरच या मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

Category

🐳
Animals

Recommended