डॉ. जयंत नारळीकर यांचा साहित्य संमेलनाला ऑडिओ क्लिपद्वारे शुभेच्छा संदेश

  • 3 years ago
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं निश्चित झालं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. जयंत नारळीकर यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना साहित्य संमेलनाला ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला आहे.