निषेध म्हणून बीड डीसीसीच्या निवडणुकीवर बहिष्कार : पंकजा मुंडे | pankaja munde | Politics|Sarakarnama

  • 3 years ago
बीड : राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निषेध करत बहिष्कार करत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली. बँकेत आम्ही वरचढ असल्याने कारस्थाने करुन सुरळीत चालणाऱ्या जिल्हा बँकेला आवसायनात आणून प्रशासक आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत. सर्व जागांची निवडणुक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो. न्यायालय व राज्यपालांपर्यंत आम्ही गेलो. मात्र, सहकार मंत्र्यांवर दबाव आणून हवे तसे निर्णय घेतले. औरंगाबाद व परभणी बॅंकेबाबत वेगळा व बीडसाठी वेगळा न्याय का, असा सवालही मुंडे यांनी केला. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#PankajaMundhe #Bank #Beed
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​