ठाण्यात AIMIM नगरसेविका सहर शेख यांची मुघल साम्राज्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट, ठाणे महानगरपालिकेतील AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांनी मुघल साम्राज्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुघलांनी बांधलेल्या वास्तू आजही दिमाखात उभ्या असून त्या कोणीही मिटवू शकत नाही, तसेच आजच्या काळात अशा वास्तू उभारणे शक्य नाही, असे मत त्यांनी पोस्टमधून व्यक्त केले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून मुघल साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, मात्र ऐतिहासिक वास्तूंमधून मुघलांचा इतिहास पुसता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहर शेख यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेला आहे.. एम आय एम पक्षाच्या मुंब्रातील नगरसेविका सहर शेख औरंगजेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट इंस्टाग्राम वर टाकल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समर्थ नायक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहर शेख यांच्या प्रभागात केला निषेध..सहर शेख यांनी औरंगजेब ह्युमायू तसेच मुघल साम्राज्य बाबत स्तुती केली आणि त्यांच्या ऐतिहासिक वास्तू बाबत स्तुती केल्यामुळे भाजप आक्रमक भूमिकेत...