Skip to playerSkip to main content
Thane Central Jail Diwali Exhibition: Handcrafted Products by Inmates on Sale

दिवाळीनिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर कैद्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आकर्षक कंदील, पणत्या, लाकडी खुर्च्या अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. कारागृहात विविध विभाग तयार करून प्रत्येक विभागासाठी प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत. कैद्यांना वेगवेगळ्या कला आणि कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जेलर राणी भोसले यांनी दिली..

#ThaneCentralJail #DiwaliExhibition #LokmatThane #ThaneNews #Diwali2024 #InmateRehabilitation #HandmadeDiwali #DiwaliKandil #EcoFriendlyDiwali #MaharashtraJail #VocalForLocal #ThaneCity #HandcraftedDecor #DiwaliShopping #MaharashtraNews

Category

🗞
News

Recommended