राहाता (अहिल्यानगर) : तालुक्यातील रुई गावात आज एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. माजी खासदार सुजय विखे पाटील गावदौऱ्यावर असताना, रस्त्याच्या कडेला शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत असलेल्या एका शेतकरी महिलेनं आवाज दिला. "दादा दादा सुजयदादा आमच्या शेतातल्या शेंगा खायला या". ही हाक ऐकताच सुजय विखेंनी गाडी थांबवली आणि थेट शेतात उतरले. मातीवर बसून त्यांनी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्या महिलेशी आणि इतर शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.शेतकऱ्यांचा माझ्याप्रती असलेला जिव्हाळा पाहून मन भारावून गेलं. मातीचा गंध घेताना माणुसकीच्या नात्याला नव्याने अर्थ मिळाला असं सुजय विखे म्हणाले. या भेटीत शेती, पाणी, पीक परिस्थिती यावर चर्चा झाली. मात्र ही भेट केवळ राजकीय दौरा न राहता मातीशी असलेल्या नात्याची जपणूक ठरली. शेतकऱ्यांशी दिलखुलास गप्पा, जमिनीवर बसण्याची विनम्रता आणि भुईमुगाच्या शेंगांचा साधा स्नेह या सर्वांतून डॉ. सुजय विखे यांची माणसांशी असलेली नाळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सुजय विखे यांची ही भेट गावकऱ्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील यात शंका नाही.