विरोधकांवर पाळत ठेवली जातेय; Nana Patole यांचं सत्ताधाऱ्यांकडे बोट

  • last year
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जातेय या पत्रकाराच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांवर पाळत ठेवली जातेय याचं सर्वात मोठं उदाहरण मी आहे, असं म्हणत पटोले यांनी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाचा दाखला दिला. तर अशोक चव्हाण हे देखील सातत्याने भाजपाविरोधात आवाज उठवतात. त्यांच्याविरोधातही षडयंत्र रचलं जात असेल म्हणून तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं पटोलेंनी म्हटलं