उद्या रंगणार 'बिग बॉस १५'चा ग्रॅन्ड फिनाले; सेटवर अभिनेत्रींचा जलवा

  • 2 years ago
बिग बॉस 15 चा गेम आता एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. स्पर्धकांचं लक्ष आता फक्त ट्रॉफीकडे आहे. हा बिग बॉस 15 चा शेवटचा आठवडा आहे. येत्या 30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे. त्यामुळे यंदा या ट्राफीवर कोणाच नाव कोरल जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदाच्या ग्रँड फिनाले अनेक स्टार्स त्यांच्या कामगिरीने आणि उपस्थितीने चमकताना दिसले. या सीझनच्या ग्रँड फिनालेला जुन्या सीझनच्या विजेत्यांसह अभिनेत्री श्वेता तिवारी, रुबिना दिलीकनेही हजेरी लावली आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी आणि रुबिना दिलीक बिग बॉसच्या सेटवर ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट झाल्या. वेब सीरिजच्या प्रमोशननंतर एका चर्चा सत्रात बोललेल्या वक्तव्यामुळे श्वेता सध्या चर्चेत आहे.