पुष्पा'चा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'; अल्लु अर्जुनचा कडक परफॉर्मन्स

  • 2 years ago
#AlluArjun #RashmikaMandanna #Pushpa #PushpaReview #MaharashtraTimes
अल्लु अर्जुन आणि समंथाच्या पुष्पा रिलीज झाला आहे. पुष्पाच्या ट्रेलरला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. खासकरुन त्यातील समंथाच्या आयटम साँगला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. याशिवाय रश्मिकाच्या सामी सामी गाण्यानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पुष्पा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर त्यांची उत्सुकता संपली आहे. अल्लु अर्जुनच्या पुप्षानं कमाल केली आहे. ज्यांना अॅक्शन, थरार, मारधाड पटांमध्ये रस आहे त्यांनी पुष्पा जरुर पाहावा. आंध्रप्रदेशातातील एका छोट्या गावामध्ये सुरु होणारी पुष्पाची कथा प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. पकड घेणारं कथानक, त्याला साजेसं असं छायाचित्रण, प्रभावी संवाद, आणि गुंगवून टाकणारं संगीत या पुष्पाच्या जमेच्या बाजू म्हणता येईल. पाहुयात काय म्हणालेत प्रेक्षक

Recommended