VIDEO : तीन पक्ष एकत्र असूनही कमळ फुललं; नाना पटोलेंना बालेकिल्ल्यातच धक्का

  • 2 years ago
#NanaPatole #BJP #LegislativeCouncilElections #MaharashtraTimes
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणूकीत भाजपने गुलाल उधळला .नागपूरमध्ये बावनकुळेंनी गुलाल उधळला, अकोल्यात भाजपचे खंडेलवाल विजयी झालेत. तीन पक्ष एकत्र असूनही कमळ फुलल्याने आघाडी सरकारला मोठा झटका बसला तर, नाना पटोलेंना बाले किल्ल्यातच पराभव पत्करावा लागला. विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. दरम्यान भाजपाच्या या विजया बाबत बावनकुळे यांनी नाना पटोले् यांच्यावर निशाणा साधला. हुकमुशाही पद्धतीने काम केल्याने हा पराभव पत्कारवा लागला आहे. महाविकास आघीडला हा पराभ पत्कारावा लागमारचं होता असंही बावनकुळे यांनी टोला लगावला.

Recommended