वस्तू आणि सेवा करात पुन्हा घट | Sales and Service Tax | Lokmat Marathi News

  • 3 years ago
आधीच्या तुलनेत कमी कर टप्प्यात आणलेल्या २०० हून अधिक वस्तू, मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी करण्यात आलेले शुल्क याचा फटका नोव्हेंबरमधील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाला बसला आहे. या अप्रत्यक्ष कर संकलनामार्फत गेल्या महिन्यात जमा झालेला महसूल रोडावत ८०,८०८ कोटी रुपयांवर येऊन ठेपला आहे.जी.एस. टी. चा नोव्हेंबर हा पाचवा महिना होता. या दरम्यान वस्तू व कर संकलन आधीच्या, ऑक्टोबर महिन्यातील ८३,००० कोटी रुपयांच्या तुलनेत घसरले आहे.वस्तू व सेवा कर परिषदेच्या नोव्हेंबर मधील बैठकीतच विविध २०० हून अधिक वस्तू कमी कर रचनेत समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर दंड म्हणून व्यापाऱ्यांसाठी असलेले शुल्क शिथिल करण्यात आले होते. वस्तू व कर संकलनाचा ओघ लक्षात घेऊन पेट्रोल तसेच डिझेल नव्या कर रचनेत अंतर्भूत करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सहमती दर्शविली आहे. पहिल्या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९५,००० कोटी रुपये या कररूपात जमा झाले होते.नोव्हेंबरमधील अप्रत्यक्ष कर म्हणून २५ डिसेंबपर्यंत ५३.०६ लाख परतावे दाखल केले आहेत. गेल्या महिन्यात भरपाई अधिभार म्हणून ७,७९८ कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended