पुन्हा एक झटका, होम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार | Lokmat Marathi News Update

  • 3 years ago
[12:52 PM, 1/21/2018] Vinay Thikana: एक्सिस बँकेने व्याजदरामध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ८.३० टक्के झाला आहे. बँकेने ३ वर्षानंतर व्याज दरामध्ये वाढ केली आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि यस बँकेने देखील जानेवारी मध्ये व्याजदरामध्ये वाढ केली आहे.या बँकांनी एमसीएलआरचा दर ०.०५ टक्क्यांवरुन ०.१० टक्के केला आहे. जानेवारीपासून हे लागू झाले आहेत. यामुळे होम लोन, ऑटो लोनचा ईएमआय वाढणार आहे. डिपॉजिटवर जास्त पैसा द्यावा लागत असल्यामुळे बँकांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. बँकांनी एप्रिल २०१६ मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग (MCLR) सिस्टम लागू केला आहे. छोट्या कालावधीसाठीच्या लोनमध्ये व्याजदर वाढलेले राहतील. रिजर्व्ह बँकेने संकेत दिले आहेत की, व्याजदरात आता वाढ किंवा घट नाही होणार. त्यामुळे बँकाचे दर देखील कमी होणार नाहीत.'

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews