राष्ट्रासाठी बाबासाहेबांचे विचार ‘होकायंत्र’च! | Dr. Babasaheb Ambedkar | Nagpur | Sakal Media |

  • 3 years ago
नागपूर : दलित साहित्याने मराठी साहित्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवे अनुभव आणि नवे संवेदनाविश्‍व यामुळे दलित साहित्याची मराठी साहित्यात सर्वांगाने चर्चा होऊ लागली. विविध साहित्यसंमेलने, साहित्य चर्चांमधून दलित साहित्यसंबंधाची सैद्धांतिक मांडणी होऊ लागली. कवी, साहित्यिक महेंद्र गायकवाड यांनी मात्र या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देऊन हा वादच निकाली काढण्याचा प्रयत्न केला. ‘भेटी लागे जीवा’ या सदरांतर्गत गायकवाड यांच्या ‘अखिल भारतीय दलित संमेलनाची दहा अध्यक्षीय भाषणे’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुलाखती’ या दोन नवीन येत असलेल्या पुस्तकांवर ‘सकाळ’ कार्यालयात त्यांच्याशी बातचित घडून आली.
#Nagpur #vidarbha #BabasahebAmbedkar
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended