नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : उपराजधानीतील पोलीस दलाभोवती कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होतो आहे. शहर पोलिस दलात आजपर्यंत ६१३ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये क्युआरटी-आरसीपी पथकातील पोलिसांचाही समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांच्या कोरोना टेस्ट करण्यात येत असून हा आकडा आणखी वाढणार आहे. आतापर्यंत सहा पोलिस कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. यामुळे शहरातील पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, दहा वर्षांपूर्वी राज्याने सांस्कृतिक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. हे धोरण राबविताना त्यासाठी आर्थिक तरतूद करणे आणि दर पाच वर्षांनी त्या धोरणाचे पुनःनिरीक्षण करणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून या धोरणासाठी पैशाचीही तरतूद करण्यात आलेली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. यासाठी अभय कोलारकर यांनी अर्ज केला होता.

नागपूर : तंत्रज्ञ -३ पदासाठी महानिर्मितीकडून सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेवून उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी नजिकच्या वीज प्रकल्पांच्या ठिकाणी २ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडीसह चंद्रपूर, मुंबई, पोफळी, पुणे, भुसावळ, नाशिक, पारस आणि परळी वीज केंद्राच्या कार्यालयात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

नागपूर : शहरातील कुख्यात डॉन संतोष आंबेकर व त्याच्या भाच्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बनावट दस्ताऐवजाच्या आधारे शेती बळकावण्याचा आरोप आहे. शुक्रवारी कामठीतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदार यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोंदिया : जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसात घर पडून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास, भीमनगरातील राधाकृष्ण वॉ

Recommended