नागपूरसह विदर्भातील सोमवारच्या महत्त्वाच्या घडामोडी I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. यामुळे मृत्यू नियंत्रणात ठेवण्यासह मृत्युदर शून्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात पदस्थापना देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

नागपूर : आज राज्यात आपली स्थिती चांगली आहे. आपल्याकडे सत्ता आहे. गृहमंत्रालय आणि कामगार, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ही चांगली नामी संधी आपल्याला आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे. काँग्रेससोबत वाटाघाटी करताना आपण आता बरोबरीचा वाटा मागू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. शहरातील जय जवान जय किसान संघटनेचे प्रमुख, आंदोलक नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांच्या पक्षात स्वागताच्या वेळी प्रफुल्ल पटेल बोलत होते.

नागपूर : श्री गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. २२ ऑगष्टला श्री गणेश चतुर्थी असून त्यादिवशी गणराज विराजमान होतील. त्यादृष्टीने सगळीकडे तयारी सुरू आहे. बाजारात गणेशाच्या मातीच्या आकर्षक मूर्ती विक्रीस आल्या आहेत. परंतू यंदा सर्व सणांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे बाजारात यावर्षी पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. कच्च्या मालाचेही दर वाढल्यामुळे मूर्त्यांचे भावही भरमसाठ वाढले असल्याचे मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांनी सांगीतले.

नागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन मोबाईल, लॅपटॉपवरूनच नगरसेवकांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येणार आहे. ऑनलाइन सभेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्य सरकारने महापालिकांना सर्वसाधारण सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय दिला आहे. महापालिकेत विविध पक्षांचे निवडून आलेले १५१ तर नामनिर्देशित ५, असे एकूण १५६ नगरसेवक असून सर्वांना या सभेबाबत तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अमरावत?

Recommended