उल्हासनगर महापालिका मनसे कामगार संघटनेचे शहराध्यक्ष, दिलिप थोरात. यांनी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस, मनपा कामगार, नाका कामगार, आणि धुणी-भांडी करणाऱ्या कामगारांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप करत, त्यांच्या सोबत गप्पा मारत साजरा केला. उल्हासनगर महापालिकेत संघटीत कामगारांसाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटना कार्यरत आहे. राज ठाकरे यांचे प्रामाणिक शिलेदार असलेले दिलिप थोरात हे ,अध्यक्ष म्हुणून काम करतात. केवळ संघटीत नव्हे, तर असंघटीत कामगारांना न्याय मिळावा हि त्यांची अपेक्षा आहे. मनसेचे संस्थापक अध्यक्ष - राज ठाकरे, यांच्या वाढदिवसाचा योग साधून, संघटीत, असंघटीत, नाका कामगरांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप केलं. आमदार राजू पाटील - मनसेचे दिग्गज नेते म्हणतात, दिलीप थोरात , तुमचे काम चाललंय जोरात.