सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) हे नेहमीच चर्चेत असतात. तसेच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. डायलॉगबाजी आणि त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर तरूणाई फिदा असते. पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उदयनराजे लुंगी नेसून थेट पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंटवर आले होते. 'मै झुकेगा नही' म्हणत हनुवटीवरून हात फिरवत त्यांनी पुष्पा स्टाईल मारली होती. त्याच स्टाईलने त्यांनी बंधू शिवेंद्रराजेंच्या दाढीचं कौतुक केलंय. त्यावर 'तुमची पण दाढी वाढवा, काही बिघडत नाही', असा सल्ला शिवेंद्रराजेंनी त्यांना दिला. त्यांच्या या दिलखुलास संवादानंतर उदयनराजे यांनी पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला. तर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघांच्या या डायलॉगबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Be the first to comment