पुणे : कार्तिक पौर्णिमेचा (Kartik Purnima 2025) दिवस हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. आज कार्तिक पौर्णिमा (05 नोव्हेंबर) (Kartik Purnima 2025) आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये (Shrimant Dagdusheth Ganpati Templei) दिव्यांची आरास करण्यात आली होती. दगडूशेठ गणपती मंदिर कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी सजविण्यात आले होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात होता.
Be the first to comment