Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
आकाशी झेप घे रे पाखरा | Aakashi Zep Ghe Re Pakhara With Lyrics


आकाशी झेप घे रे पाखरा (२)

सोडी सोन्याचा पिंजरा (२)

तुजभवती वैभव माया,
फळ रसाळ मिळते खाया (२)

सुखलोलुप झाली काया,
हा कुठवर वेड्या घेसी आसरा?

सोडी सोन्याचा पिंजरा (२)

घर कसले ही तर कारा,
विष समान मोती चारा (२)

मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा?

सोडी सोन्याचा पिंजरा (२)
तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने (२)

दरी, डोंगर, हिरवी राने (२)...
जा ओलांडुनिया सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा (२)


कष्टाविण फळ ना मिळते,
तुज कळते परि ना वळते (२)

हृदयात व्यथा ही जळते,
का जीव बिचारा होई बावरा?

सोडी सोन्याचा पिंजरा (२)

घामातून मोती फुलले,
श्रमदेव घरी अवतरले (२)

घर प्रसन्नतेने नटले (२)

हा योग जीवनी आला साजिरा

सोडी सोन्याचा पिंजरा (२)

आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२)

#mysangeet
#abhangtukayache
#tukarammaharaj
#abhang
#marathibhaktigeete
#marathiabhang
#marathisong
#marathibhajan
#marathilyrics
#marathichitrapat
#majhemaherpandhari
#vithalbhaktigeet
#vithumauli
#abhangvani
#abhangsong
#dailymotion

Category

🎵
Music
Be the first to comment
Add your comment

Recommended