महावितरणचे राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे अदानी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये, या मागणीसाठी वीज कर्मचारी संपावर गेलेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. महावितरणचं खाजगीकरण रद्द करा आणि अदानी गो बॅकच्या घोषणा कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. कर्मचारी संपावर गेल्यानं मुंबई, पुणे, साताऱ्यासह राज्यातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Be the first to comment