Income Tax Department चे अधिकारी असल्याचं सांगून पाच जणांच्या टोळीने व्यावसायिकाला लुटलं : ABP Majha

  • 2 years ago
अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा सिनेमा आठवतोय का? ज्यात अक्षय कुमार आणि त्याचे सहकारी तोतया अधिकारी बनून अनेकांना हातोहात गंडवतात.. असाच प्रकार मुंबईत सुरु आहे.. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून पाच जणांच्या टोळीने मुंबईतल्या विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला... आणि या बनावट कारवाईत रोख जप्त केली.. मात्र शेरास सव्वाशेर भेटतोच.. पोलिसांनी देखील वेगाने तपासाची चक्र फिरवत तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.. आरोपींमध्ये मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, वाहतूक व्यावसायिक वसीम कुरेशी, चालक धीरज कांबळे आणि इजाज अशा चार जणांना अटक केलीय.. या आरोपींनी तोतया अधिकारी बनून 26 जुलै रोजी विक्रोळीतल्या व्यावसायिकाला सावज केलं होतं..  

Recommended