गणेशोत्सव पाच दिवसांवर येऊन टेपलाय आणि बाप्पांच्या आगमनाची लगबगही सुरु झालीय. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा ओघ वाढलाय आणि सरकारनं त्यांना आजपासून टोलमाफीचं गिफ्ट दिलंय. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आजपासून टोल माफी देण्यात आलीय. मुंबई-बेंगळुरू आणि मुंबई-गोवा महामार्गावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अन्य पथकर नाक्यांवर ११ सप्टेंबरपर्यंत ही सवलत असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. टोलमाफीसाठी प्रवाशांना पोलीस आणि परिवहन विभागाकडे पासेस उपलब्ध आहेत. दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरु आहे.
Be the first to comment