Kirit Somaiya at Dapoli : अनिल परबांच्या साई रिसॉर्टविरोधात मोहीम, सोमय्यांकडून पाहणी

  • 2 years ago
भाजप नेते किरीट सोमय्या आज शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी दापोलीच्या मुरुडमध्ये पोहोचणार आहेत. खेडमध्ये दाखल झाल्यानंतर ते आता साई रिसॉर्टकडे रवाना झाले आहेत... नखेडमध्ये सोमय्या यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय... याठिकाणी अनिल परब यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येतेय.. महाविकास आघाडीचं सरकार असताना सोमय्या यांनी दापोलीपर्यंत हातोडा यात्रा काढली होती. परब यांचं साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्रीय पर्यावरण खात्यानं आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यामुळे सोमय्या आज खेड ते साई रिसॉर्ट असा दौरा करणार आहेत. दरम्यान परब दोन दिवसांपासून मुंबईतील घरी नसल्याची माहिती मिळतेय... रिसॉर्टवर कारवाई संदर्भात प्रतिक्रिया द्यावी लागेल त्यामुळे परब अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे.

Recommended