शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांचं हे आवाहन जुमानलं नव्हतं. त्यानंतरही बंडखोर आमदारांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेला डेडलाईन दिली होती. भाजपसोबत युती करण्याचं आवाहन बंडखोरांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नरमाईचा सूर आळवला आहे.
Category
🗞
News