Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/18/2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबा यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केलं. त्यामुळे आईला भेटण्यासाठी आज मोदी गुजरात दौऱ्यावर आले आहेत... आज सकाळी सात वाजायच्या आधीच मोदी त्यांचे बंधू पंकज मोदी यांच्या घरी पोहोचले... आणि त्यांनी आई हीराबा यांची भेट घेतली... आज वडनगर मधील हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी या पूजेत सहभागी होणार आहेत... मोदींच्या आईच्या सन्मानार्थ आज गांधीनगरमधील एका रस्त्याचं नामकरण पूज्य हीरा मार्ग असं करण्यात येणार आहे... यासोबतच मोदींच्या हस्ते आज गुजरातमधील २१ हजार कोटींच्या विकास कामांचं ही उद्घाटन होणार आहे..

Category

🗞
News

Recommended