Kolhapur: धनंजय महाडिकांच्या विजयावर समर्थकांनी कोल्हापुरात गुलाल उधळून केला जल्लोष 

  • 2 years ago
राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. ४१ मतं मिळवून त्यांनी राज्यसभा गाठली.  त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा दोन मतांनी पराभव झाला.  महाडिकांच्या या विजयाचं गेल्या दोन दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्रात सिलिब्रेशन सुरु आहे. यातचं आज महाडिकांनी कोल्हापूर गाठलं, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून त्यांचं जग्गी स्वागत केलं. डीजेच्या तालावर समर्थकांनी महाडिकांच्या विजयाचं जंग्गी सेलिब्रेशन केलं.
#kolhapur #dhananjaymahadik #dhanajaymahadikbjp #kolhapurnewsupdates #koalhapurnews #bjp #devendrafadnavis #narendramodi #sakal #sakalmedia

Category

🗞
News

Recommended