आधी संबंधित बिल्डर व महापौरांवर कारवाई करा; BMC च्या नोटीशीनंतर Ravi Rana यांची पहिली प्रतिक्रिया |

  • 2 years ago
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा शिवसेनेसोबत वाद सुरू असतानाच मुंबई मनपाने राणा दाम्पत्याला अनधिकृत बांधकाम प्रकरणात नोटीस बजावली. मुंबईतील खार येथील घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला याबाबत आपलं उत्तर दिलं. आता पुन्हा एकदा मुंबई मनपाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावत इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

#NavneetRana #RaviRana #BMCElection
#Amravati #Mumbai #SenaVsRana #Matoshree #UddhavThackeray #SanjayRaut #Amravati

Recommended