तुमच्यामुळे लोकांचे हाल होतायत, कामावर या; परिवहन मंत्र्यांचं आवाहन

  • 2 years ago
आम्ही वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहोत की कोणताही चुकीचं पाऊल उचलू नका. 22 तारखेला त्यांचा निकाल आहे त्यानंतर आम्ही बोलू अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. जे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत त्यांनी दखल घेतली आहे. त्यांना जी पगार वाढ हवी होती ती दिली आहे. बाकीच्या गोष्टीं साठीही ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या आम्ही बोलू. कर्मचाऱ्यांनी आधी कामावर यावं मग त्यावर चर्चा करू. कर्मचारी त्यांच्या मागणीवर अडून राहिल्याने जनतेचे हाल होत आहेत.

Recommended