हातात कासरा, बैलगाडीवर उभा; उदयनराजेंनी खास स्टाईलमध्ये उडवली कॉलर

  • 2 years ago
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीवर उभा राहून धडाकेबाज एंट्री केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीत उदयनराजे यांनी बैलगाडीवर एंट्री करून कॉलर उडवत एकच धुराळा उडवून दिला. उदयनराजे हे बैलगाडीवर आल्याचे पाहून समर्थकांनी एकच जयघोष करून परिसर दणाणून सोडला. 'मध्यंतरी बैलगाडा शर्यतीवर बंदी का घातली हे मला माहीत नाही मात्र मोठमोठ्या लोकांच्या घोडे शर्यतीवर बंदी घालण्यात आली नव्हती. कारण तिथं मोठया पैशाच्या उलाढाली होतात. शेतकरी आपल्या पोटच्या मुलांपेक्षा बैलांना जपतात. त्यांचं पालन पोषण करतात. शेतकऱ्यांचा हा छंद पारंपरिक पद्धतीने सुरू आहे. स्पर्धा सुरू व्हायला या लोकांचं श्रेय आहे. मी फक्त निमित्त आहे, असं उदयनराजे म्हणाले.

Recommended