शिवजयंतीची जय्यत तयारी; खरेदीसाठी शिवप्रेमींमध्ये उत्साह

  • 2 years ago
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. जयंतीनिमित्त प्रत्येक शिवप्रेमी आपल्या घरावर शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावतो. शासनाने कोरोना निर्बंध शिथिल केल्याने शिवप्रेमींमध्ये आनंद संचारला असून उत्साह शिगेला पोहचला आहे़. दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या उत्सवासाठी बाजारपेठेत विविध आकाराचे झेंडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये अनेक प्रकार असून छत्रपती शिवरायांचा फोटो असलेल्या झेंड्यास सर्वाधिक मागणी आहे. छत्रपतींचा फोटो असलेले झेंडे, जाणता राजा झेंडा, स्केच असलेला झेंडा आदी प्रकारचे झेंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासोबतच शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती आणि इतर साहित्य विक्रीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. शिवजयंती उत्सवासाठी शिवप्रेमींकडून खरेदीची लगबग वाढल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात दिसत आहे.