'मेजर' चित्रपट अभिनेत्री सई मांजरेकर एअरपोर्टवर स्पॉट

  • 2 years ago
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. सई हैदराबाद वरुन परतली असून यावेळी ती हटके आणि क्यूट लूकमध्ये चाहत्यांना दिसली. सई मांजरेकर आणि साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. या दोघांच्या अफेरची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र याबाबत सईने खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सई मांजरेकरने प्रभुदेवाच्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटात सई सलमान खान सोबत मुख्यभूमिकेत दिसली होती.  सई लवकरच 'मेजर' या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित असून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.