रावडी! 'साऊथ सेन्सेशन' विजय देवरकोंडा एअरपोर्टवर स्पॉट

  • 2 years ago
विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. विजयच्या खात्यात अनेक सुपरहिट चित्रपट जमा आहेत. पण त्याचा 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. गेल्या चार वर्षांत विजयने 'पेन्ली चुपुलू', 'महानती', 'गीता गोविंदम', 'डीअर कॉम्रेड' आणि 'टॅक्सी ड्रायव्हर' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. विजय देवरकोंडाचे कुटुंब त्याला रावडी नावाने हाक मारतात. यामुळेच त्याचे चाहते त्याला रावडी देखील म्हणतात. विजय देवरकोंडा चित्रपट निर्माताही आहे. हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव आहे. यावेळी 'साऊथ सेन्सेशन' विजय देवरकोंडा आणि चार्मी कौर एअरपोर्टवर एकत्र दिसले.

Recommended