नैसर्गिक संकटांना टक्कर देणारा शेतकरी; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन पाठ थोपटली

  • 2 years ago
चंद्रपूर जिल्हाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. बळीराजाला मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. अवकाळीने डोळ्यात पाणी आनलेले असतांना एक आनंदाची बातमी जिल्ह्यात धडकली. जिल्ह्यातील एक सूशिक्षित तरूण शेतकरी राज्यपातळीवर दिला जाणारा युवा शेतकरी पुरस्कारासाठी पात्र ठरला. अवकाळीच्या जखमेने लाहीलाही झालेल्या बळीराजाच्या ओठावर हास्य फुलविणारी ही घटना ठरली. अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुल तालुक्यातील प्रशांत मेश्राम हे पुरस्कारासाठी पात्र ठरले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मेश्राम यांच्या शेतीला भेट देत शेतकऱ्याची पाठ थोपटली. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...