last year

पाच वर्षांचा चिमुकला मृतावस्थेत ड्रममध्ये आढळला; पुढचं सत्य त्यापेक्षाही भयंकर निघालं

Navbharattimes
Navbharattimes
ठाण्यातील कळवा परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आलयं. एका पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या त्याच्या आईनंच खून केला असल्यानं एकच खळबळ उडाली. घरातून अज्ञात व्यक्तीने उचलून नेल्याची तक्रार आईनेच शुक्रवारी नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या आईला अटक केली. कळवा परिसरात महात्मा फुले नगरमध्ये पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये चिमुकलं बाळ आढळून आलं होतं. चौकशीदरम्यान बाळाच्या आईने स्वतः बाळाला खोकल्याचे औषध दिल्याचं कबूल केलं. या खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस झाल्यामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली होती. या बालकाचा मृत्यू नेमका औषधाच्या ओवर डोसमुळे झाला की पाण्यात बुडून झाला, याचा आता शोध घेतला जातो. त्यासाठी चिमुकल्याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Browse more videos

Browse more videos