Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/24/2021
काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर बेळगावात मराठी तरुणांनी आक्रोश केला. या तरुणांवर कर्नाटक सरकारने कारवाई केली आहे. याच संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव येथील प्रतिनिधींनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. 'कर्नाटक सरकार दडपशाहीने कारवाई करत असून हे योग्य नसल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे. बेळगावातील मराठी बांधवांसोबत महाविकास आघाडी सरकार आहे.', असं उदय सामंत यांनी तरुणांना आश्वासन दिलं आहे.

#udaysamant #belgaon #chatrapatishivajimaharaj #karnataka #maharashtra

Category

🗞
News

Recommended