दक्षिण मुंबईमध्ये अनेक हेरिटेज इमारती आणि गगनचुंबी इमारतीही आहेत. त्यामुळे मेट्रो ३च्या मार्गाची निर्मिती आणि बांधणी सुरू असताना त्यांना किंचितसाही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक होते. आव्हान होते ते म्हणजे यातील अनेक हेरिटेड इमारती शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत आणि त्यांचे आराखडे उपलब्धच नाहीत. त्यामुळेच इथून मेट्रो मार्ग तयार करताना विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले. अशाच प्रकारचे आव्हान होते ते मरोळ स्थानक तयार करताना कारण वरच्या बाजूने अंधेरी- कुर्ला मार्ग जातो आणि तिथेही घाटकोपर- अंधेरी मेट्रो मार्ग वरच्या बाजूस होता. किंचितसा धक्काही पूर्ण मेट्रो मार्ग खाली आणण्यास पुरेसा होता. हे आव्हानही व्यवस्थित पार करण्यात आले...
Be the first to comment