भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदी रुजू होणार आहेत. याआधी त्या अँग्लो-डच कंपनी युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून कारभार सांभाळत होत्या. या कार्यकारी पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. लीना लवकरच फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैल कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी हाती घेतील. परदेशातील कंपनीच्या सीईओपदी आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची वर्णी लागल्याने लीना नायर यांची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मग जाणून घेऊया लीना नायर यांच्या प्रवासाबद्दल.
#LeenaNair #Unilever #india #kolhapur
#LeenaNair #Unilever #india #kolhapur
Category
🗞
News